बीड जिल्ह्याचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.11 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 2866 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 130 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2736 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्याची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. यामुळे लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See Taluka wise statistics.)

बीड जिल्ह्याची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे दिलासादायक चित्र दिसत आहे.
अशी आहे तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-28, अंबाजोगाई-15, आष्टी-9, धारुर-7, गेवराई-4, केज-23, माजलगाव-13, परळी-4, पाटोदा-5, शिरुर-16, वडवणी-6 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत मोठी घटली आहे. जिल्ह्यात निर्बंध शिथिल केल्यानंतर जनजीवन पुर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. मागिल चार दिवसात संख्या उतरुन दिडशेच्या आत आली आहे. जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत.

दरम्यान, देशातला करोनाचा कहर हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कमी झालेली रुग्णसंख्या कालपासून पुन्हा वाढलेली दिसत आहे. त्याचबरोबर मृतांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे देशवासीयांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ९१ हजार ७०२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ११ लाख २१ हजार ६७१वर पोहोचली आहे.
देशात काल दिवसभरात एक लाख ३४ हजार ५८० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातल्या करोनामुक्तांची एकूण संख्या दोन कोटी ७७ लाख ९० हजार ७३ वर पोहोचली आहे.

देशात गेल्या २४ तासांत ३,४०३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता तीन लाख ६३ हजार ७९ वर पोहोचली आहे. तर देशातला मृत्यूदर १.२४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!