सोमवारी संख्येत वाढ… बीड जिल्ह्याचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.14 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 2297 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 154 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2063 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्याची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. मात्र शनिवारी रुग्ण संख्या 50 ने वाढली होती. रविवारी घटलेली संख्या सोमवारी पुन्हा वाढली आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See Taluka wise statistics.)
अशी आहे तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-14, अंबाजोगाई-9, आष्टी-59, धारुर-5, गेवराई-11, केज-22, माजलगाव-4, परळी-1, पाटोदा-2, शिरुर-20, वडवणी-7 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत मोठी घटली आहे. काल रुग्ण संख्येत घट होवून मोठा दिलासा मिळाला होता. नवीन आदेशानूसार उद्या 15 पर्यंत निर्बंध शिथिलता आहे. यानंतर निर्बंधात मोठी सुट मिळण्याची अपेक्षा व्यापारीवर्गात आहे.
दरम्यान, राज्यात रविवारी 10,442 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 7,504 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 483 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी नोंदवण्यात आली आहे.
राज्यात रविवार पर्यंत एकूण 1,55,588 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 15 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 13 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण 56,39,271 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.