जिल्हा स्थिर… बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.30 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 4791 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 509 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4292 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Today’s corona update in Beed district; See Taluka wise statistics.)
आज बीड तालुक्यात 121 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यातील बीड पाठोपाठ सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या कमी झाली आहे. आज अंबाजोगाईत 31 व आष्टी तालुक्यात 102 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 17 तर केजमध्ये 54 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-121, अंबाजोगाई-31, आष्टी-102, धारुर-17, गेवराई-48, केज-54, माजलगाव-37, परळी-8, पाटोदा-38, शिरुर-32, वडवणी-21 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये आहे. जिल्ह्यात नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दिवसेंदिवस कमी होत असून आता पॉझिटीव्हीटी रेट 10 टक्क्याच्या आत आली आहे. यामुळे जिल्ह्यात 31 मे पर्यंत लावण्यात आलेला लॉकडाऊन (lockdown) शिथिल होण्याकडे वाटचाल सुरु आहे.
दरम्यान, राज्यात रोज कमी होणाऱ्या रुग्णसंख्या पाहता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यात काल 20,295 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 31 हजार 964 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता रिकव्हरी रेट 93.46 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज 443 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरी भागात कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात येताना दिसत आहे.
मात्र, ग्रामीण भागात अजूनही कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. राज्यात सध्या सहा जिल्ह्यांमध्ये नवीन कोरोना रुग्णसंख्या हजारच्या पुढे नोंद होत आहे. यात मुंबई 1038, अहमदनगर 1246, पुणे 1259, सातारा 2177, कोल्हापूर 1611 आणि सांगली 1063 असा समावेश आहे.