बीड जिल्ह्यातील सोमवारचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.31 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 4200 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 516 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3684 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Today’s corona update in Beed district; See Taluka wise statistics.)
आज बीड तालुक्यात 218 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यातील बीड पाठोपाठ सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यात गेल्या काही दिवसांत संख्या झपाट्याने उतरली आहे. आज अंबाजोगाईत केवळ 18 व आष्टी तालुक्यात 57 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 14 तर केजमध्ये 64 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-218, अंबाजोगाई-18, आष्टी-57, धारुर-14, गेवराई-49, केज-22, माजलगाव-26, परळी-64, पाटोदा-58, शिरुर-26, वडवणी-22 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये आहे. जिल्ह्यात नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दिवसेंदिवस कमी होत असून आता पॉझिटीव्हीटी रेट 20 टक्क्याच्या आत आला आहे. यामुळे जिल्ह्यात 31 मे पर्यंत लावण्यात आलेला लॉकडाऊन (lockdown) मध्ये काही प्रमाणात शिथिलता भेटण्याकडे वाटचाल सुरु आहे. दरम्यान, काल मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवल्याचे जाहिर केले.
दरम्यान, रविवारी राज्यात 18 हजार 600 नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 57 लाख 31 हजार 815 झाली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 लाख 71 हजार 801 वर पोहोचली आहे. तसेच 402 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर 1.65 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 94 हजार 844 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असतानाच समाधानकारक बाब म्हणजे राज्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात बरेही होत आहे.
रविवारी 22 हजार 532 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 53,62,370 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.55 टक्के एवढे झाले आहे.