आजही पाचशेच्या आत… बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.2 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 3852 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 375 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3477 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्याची संख्या आज सलग दुसऱ्या दिवशीही पाचशेच्या आत आल्याने दिलासा मिळत आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See Taluka wise statistics.)
आज बीड तालुक्यात अनेक दिवसानंतर कालची संख्या शंभरच्या आत होती. आजही आज 77 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यातील बीड पाठोपाठ सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यात गेल्या काही दिवसांत संख्या झपाट्याने उतरली आहे. आज अंबाजोगाईत केवळ 26 व आष्टी तालुक्यात 54 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 7 तर केजमध्ये 42 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-77, अंबाजोगाई-26, आष्टी-54, धारुर-7, गेवराई-51, केज-42, माजलगाव-26, परळी-16, पाटोदा-28, शिरुर-36, वडवणी-12 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये आहे. मात्र जिल्ह्यात नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दिवसेंदिवस कमी होत असून आज पाचशेपेक्षा कमी रुग्ण संख्या आली आहे. पॉझिटीव्हीटी रेट 20 टक्क्याच्या आत आला आहे. दरम्यान जिल्ह्यात लॉकडाऊन (lockdown) मध्ये वाढ करत 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला असून अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सकाळी 7 ते 11 पर्यंत खुल्या राहणार आहेत.
दरम्यान, सोमवारी राज्यात केवळ 15,000 नवीन रुग्ण आढळले असून गेल्या 5 मार्चनंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. आणखी एक दिलासा म्हणजे संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारनं केलेल्या प्रयत्नांनाही यश मिळून येताना दिसून दिसत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) आज 35,949 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण 54,31,319 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.28 % एवढे झाले आहे.
मंगळवारी राज्यात 14,123 नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज 477 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.67% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,52,77,653 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,61,015 (16.33 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.