बीड जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.5 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 3958 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 243 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3715 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्याची संख्या आज तिसऱ्या दिवशी तीनशेच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला असून अनलॉक कडे वाटचाल आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See Taluka wise statistics.)
बीड जिल्ह्याची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने अनलॉककडे वाटचाल सुरु आहे. आज बीड तालुक्यात 38 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. रुग्णसंख्येत सतत मोठा आकडा असलेल्या अंबाजोगाईत गेल्या आठवड्यापासून समाधानकारक स्थिती आहे. बीडनंतर सध्या आष्टीत रुग्ण संख्या इतर तालुक्याच्या तुलनेत अधिक आहे. आज अंबाजोगाईत केवळ 16 व आष्टी तालुक्यात 39 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 20 तर केजमध्ये 29 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-38, अंबाजोगाई-16, आष्टी-39, धारुर-20, गेवराई-14, केज-29, माजलगाव-29, परळी-4, पाटोदा-34, शिरुर-10, वडवणी-10 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत मोठी घट झाली आहे. जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात असून लॉकडाऊन (lockdown) मध्ये 7 जूनपासून सुट मिळण्याची शक्यात आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 10 टक्क्याच्या आत आला असून सोमवारी काय निर्बंध कमी होतील ते जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, राज्यात शुक्रवारी 14 हजार 152 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 20 हजार 852 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 289 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत राज्यात 98 हजार 771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 1.7 टक्के आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी झाली आहे. राज्यात आज एकूण 1 लाख 96 हजार 894 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.