आज आणखी कमी, बीड जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.7 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 2845 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 155 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2690 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्याची संख्या कालपासून दोनशेच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला असून कोरोनामुक्तीकडे वाटचाल आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See Taluka wise statistics.)
बीड जिल्ह्याची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने अनलॉककडे वाटचाल सुरु आहे. आज बीड तालुक्यात केवळ 20 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. रुग्णसंख्येत सतत मोठा आकडा असलेल्या अंबाजोगाईत गेल्या आठवड्यापासून समाधानकारक स्थिती आहे. बीडनंतर सध्या आष्टीत रुग्ण संख्या इतर तालुक्याच्या तुलनेत अधिक आहे. आज अंबाजोगाईत 18 व आष्टी तालुक्यात 35 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 11 तर केजमध्ये 21 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-20, अंबाजोगाई-18, आष्टी-35, धारुर-11, गेवराई-13, केज-21, माजलगाव-3, परळी-3, पाटोदा-5, शिरुर-19, वडवणी-7 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात आजपासून लॉकडाऊन (lockdown) मध्ये सुट देण्यात आली आहे. सकाळपासून बाजार गजबजलेले दिसत असून एसटी बसही सुरु झाल्या आहेत. यामुळे जनजीवन पुर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र प्रचंड गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. आज 14,433 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 55,43,267 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.05% एवढे झाले आहे. आज राज्यात एकूण 12,557 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांच्या तुलनेत ही संख्या सर्वात कमी आहे. राज्यात आज 233 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 1.72% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,65,08,967 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,31,781 (15.97 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.