माजी नगराध्यक्ष प्रा. मुकूंद सावंत यांचे निधन; शहर शोकाकूल.

किल्लेधारूर दि.8 फेब्रुवारी – किल्लेधारूर नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रा.मुकूंद फकीरा सावंत यांचे वयाच्या 63 व्या वर्षी पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.
(Former Mayor Pvt. Mukund Sawant passed away; The city mourns.)
धारुर (Dharur) शहराच्या राजकीय तथा शैक्षणिक क्षेत्रात प्रा. सावंत यांचे मोठे योगदान होते. येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात 20 वर्ष ते उपप्राचार्य (Vice Principal) म्हणून कार्यरत होते. वाणिज्य शाखेत अतिशय विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ते परिचित होते. शैक्षणिक क्षेत्रासह राजकारणात त्यांचा हातकंडा होता.
1997 मध्ये त्यांची वर्णी धारुर शहराच्या नगराध्यक्ष (mayor) पदी लागली होती. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळावर त्यांची नुकतीच निवड झाली होती. ते येथील महाविद्यालय विकास समिती, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य होते.
2011 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) निवडणूक लढवून ते नगरसेवक म्हणून मोठ्या फरकाने निवडून आले. 2011 ते 2016 पर्यंत ते नगर परिषदेत राष्ट्रवादीचे गटनेते होते. महाविद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी ते आग्रही होते. त्यांच्या अकाली निधनाने शहरातील शैक्षणिक व राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
त्यांच्यावर पुणे (Pune) येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar hospital) गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सुना नातवंड असा परिवार आहे. ते डॉक्टर्स असोशिऐशनचे (Doctors Association) अध्यक्ष डॉ. मयुर सावंत यांचे वडील होत.
प्रा. मुकूंद सावंत यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाचे वृत येताच शहरात हळहळ व्यक्त होत आहे.