बीड जिल्हा कोरोना अपडेट… मृत्यू संख्येत वाढ, पहा आजची तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.16 फेब्रुवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1295 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 17 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1278 जण निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी जिल्ह्यात मृत्यू संख्येत तीनने वाढ झाली.
( Today’s Corona Update in Beed District; See what the status is. )
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-3, अंबाजोगाई-1, आष्टी-4, धारुर-0, गेवराई-1, केज-1, माजलगाव-2, परळी-0, पाटोदा-2, शिरुर-3, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या 17 असून संशयितांच्या तपासण्या 1295 आहे. आज 8 तालुक्यात रुग्ण आढळले आहेत. गेल्या दोन दिवसात बाधितांचा आकडा 20 च्या खाली आहे.
बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या मंगळवारच्या नोंदीनूसार 44 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यू संख्येत तीनने वाढ होवून जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2867 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 161 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 2.64 टक्के, रिकव्हरी रेट 97.20 तर डेथ रेट 2.64 आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात 2 हजार 831 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना बाधितांमध्ये मोठ्या संख्येने घट झाली असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपुर्वी महाराष्ट्रात नव्या कोरोना बाधितांचा आकडा पाच हजारांच्या घरात होता परंतु आता बाधितांच्या आकड्यामध्ये घट झाली असून ही महाराष्ट्रासाठी दिलासादायक बाब आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 8 हजार 695 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत 76,69,772 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात 2 हजार 831 नव्या कोरोना बाधितांसह एकूण 78 लाख 47 हजार 746 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात सध्या 30 हजार 547 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून 97.73 टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेच ३५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. आजपर्यंत एकूण 7 कोटी 66 लाख 39 हजार 114 कोरोना चाचण्या केल्या असून 78 लाख 47 हजार 746 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.