पाच राज्यांच्या निवडणूकीचे बिगुल वाजले; निवडणूक आयोगाची घोषणा

नवी दिल्ली दि.२६ फेब्रुवारी- भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. यात पश्चिम बंगाल २९४ जागांसाठी, तमिळनाडू २३४ जागांसाठी, केरळ १४०, आसाम १२६ तर केंद्रशासित पुदुच्चेरीतल्या ३० जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण ८२४ विधानसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीत १८.६८ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
(Five state election trumpets sounded; Election Commission announcement)
भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission) आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू केली आहे. २७ मार्चपासून मतदानाला सुरुवात होईल. तर मतमोजणी २ मे ला होईल.
असा असेल निवडणूकीचा कार्यक्रम…
केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. ६ एप्रिलला मतदान होईल आणि २ मे रोजी मतमोजणी आणि निकाल लागेल.
आसामची निवडणूक ३ टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्याचं मतदान २७ मार्चला होईल. दुसऱ्या टप्याचे मतदान १ एप्रिल तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान ६ एप्रिलला होईल.
पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिला टप्पा २७ मार्च, दुसरा टप्पा १ एप्रिल, तिसरा टप्पा ६ एप्रिल आणि चौथा टप्पा १० एप्रिलला होईल. पाचवा टप्पा मतदान १७ एप्रिल, सहावा २२ एप्रिल, सातवा २६ एप्रिल, आठवा टप्पा २९ एप्रिलला होईल. त्यानंतर २ मे ला मतमोजणी व निकाल लागण्याची शक्यता आहे.