बीड जिल्हा कोरोना अपडेट; आज सहा तालुके ॲक्टीव.

बीड दि.22 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1382 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 18 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1364 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-3, अंबाजोगाई-0, आष्टी-6, धारुर-0, गेवराई-2, केज-3, माजलगाव-2, परळी-0, पाटोदा-2, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना (Corona) काल व आज बाधितांची संख्या अधिक आहे. काल मृत्यूच्या संख्येत 1 ने वाढ झाली. तर 22 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील एकुण मृत्यूची संख्या 2800 झाली आहे. आज पर्यंतच्या नोंदी नुसार जिल्ह्यात एकुण 150 ॲक्टीव रुग्ण आहेत. आज 5 तालुक्यात बाधितांची संख्या शुन्य आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत गुरुवारी घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील वाढली आहे. राज्यात 1,573 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2,968 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 64 लाख 30 हजार 394 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.46 टक्के आहे. तसेच दिवसभरात 39 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 925 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका झाला आहे.