बीड जिल्ह्यातील कोरोना अपडेट; पहा तालुका निहाय स्थिती.

बीड दि.24 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 909 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 18 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 891 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-4, अंबाजोगाई-4, आष्टी-4, धारुर-0, गेवराई-0, केज-1, माजलगाव-0, परळी-2, पाटोदा-2, शिरुर-1, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) सलग तिसऱ्या दिवशी वाढ दिसून आली. काल 19 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील एकुण मृत्यूची संख्या 2800 आहे. आज पर्यंतच्या नोंदी नुसार जिल्ह्यात एकुण 143 ॲक्टीव रुग्ण आहेत. आजही 4 तालुक्यात बाधितांची संख्या शुन्य आहे.
दरम्यान, राज्यात मागील 24 तासात राज्यात (Corona Paitents)1701 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना संसर्ग कमी होत असल्याचं दिसतं आहे. मात्र, असं असलं तरीही नागरिकांनी योग्य ती काळजी घेणं देखील गरजेचं आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 33 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,39,998 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 24 हजार 022 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात 23 ऑक्टोबर रोजी 1781 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.