बीड जिल्हा कोरोना अपडेट; पहा तालुका निहाय स्थिती.

बीड दि.25 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 599 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 5 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 594 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-1, अंबाजोगाई-0, आष्टी-1, धारुर-0, गेवराई-0, केज-2, माजलगाव-1, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) सलग तिन दिवस वाढलेली संख्या आज केवळ 5 वर आली आहे. आज जिल्ह्यात संशयितांच्या तपासण्याची संख्या सहाशे पेक्षा कमी आहे. आज जिल्ह्यातील 4 तालुक्यात बाधितांची संख्या पाच आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत आहे. राज्यात रविवारी 1 हजार 410 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 18 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील एकूण कोरोना बाधित (Corona Positive) रूग्णांची संख्या 66 लाख 02 हजार 961 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 35 हजार 439 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. आज 1 हजार 520 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.46 टक्के एवढा झाला आहे.