धारुर व आष्टीत सर्वाधिक रुग्ण; पहा बीड जिल्ह्याचे कोरोना अपडेट.

बीड दि.26 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 594 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 9 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 585 जण निगेटिव्ह आली आहेत. आजच्या अहवालात 9 बाधितांपैकी 4 आष्टी तर 3 धारुर तालुक्यातील आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-1, आष्टी-4, धारुर-3, गेवराई-0, केज-0, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-1 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) सलग दुसऱ्या संख्या दहाच्या आत आहे. कल 5 वर असलेली संख्या आज 9 आहे. आजही जिल्ह्यात संशयितांच्या तपासण्याची संख्या सहाशे पेक्षा कमी आहे. आज जिल्ह्यातील आष्टी व धारुर तालुक्यात बाधितांची संख्या अधिक आहे.

दरम्यान, सोमवारी राज्यात गेल्या 899 नव्या कोरोना रुग्णांची (Corona Positive) नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यातील रुग्णसंख्येनंतरची ही सर्वात मोठी घट आहे. तर आज राज्यात कोरोनामुळे 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे मृत्यूचे प्रमाण 2.12 टक्के इतके कमी झाले आहे. तर एकूण 1586 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रूग्णांचा रिकवरी रेट सध्या 97 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेनुसार, सध्या राज्यात 1 लाख 83 लाख 092 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत आणि 957 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांचे प्रमाण 1 टक्क्य़ांवर पोहचले आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील 14 जिल्ह्यांची संख्या शुन्यावर आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!