बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट; पहा काय आहे स्थिती.

बीड दि.12 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1203 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 20 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1183 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-4, अंबाजोगाई-3, आष्टी-3, धारुर-0, गेवराई-1, केज-2, माजलगाव-0, परळी-1, पाटोदा-3, शिरुर-1, वडवणी-2 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत बऱ्यापैकी कमी झाली आहे. जिल्ह्यात कोरोना मृत्यू दर मात्र चिंताजनक आहे. सोमवारी एकही मृत्यूची नोंद नाही. मात्र बुधवारी (दि.6) 4, गुरुवारी (दि.7) 2, शुक्रवारी (दि.8) 2, शनिवारी (दि.9) 2 तर रविवारी (दि.10) रोजी 1 कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. गेल्या पाच दिवसात तब्बल 11 कोरोना बळींची नोंद झाली. जिल्ह्यातील एकुण मृत्यूची संख्या आता 2785 झाली आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर राज्यात सर्वाधिक 2.70 इतका आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) काल दि.11 ऑक्टोबर रोजी 24 तासांमध्ये 1736 कोविड 19 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान ही मागील 17 महिन्यांमधील राज्यातील निच्चांकी नोंद आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार दिवसभरात 36 रूग्ण दगावले आहेत. राज्यात कालच्या तुलनेत 550 रूग्ण कमी आढळले असले तरीही दगावलेल्यांच्या संख्येत कालच्या तुलनेत वाढ आहे. काल राज्यात 28 मृत्यू आणि 222294 नवीन रूग्ण आढळले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!