बीड कोरोना अपडेट… आज वाढ; पहा तालुका निहाय परिस्थिती.

बीड दि.31 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 965 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 11 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 954 जण निगेटिव्ह आली आहेत. आज पाच तालुक्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत तर इतर तालुके शुन्यावर आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-3, अंबाजोगाई-0, आष्टी-5, धारुर-1, गेवराई-0, केज-0, माजलगाव-0, परळी-1, पाटोदा-0, शिरुर-1, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या शुक्रवारी 8, शनिवारी 8 तर आज रविवारी 11 आली आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार शनिवार 13 जण कोरोनामुक्त झाली आहेत. जिल्ह्यात मृत्यूची एकुण संख्या 2805 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 123 आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात आज राज्यात 1 हजार 130 नवे कोरोना बाधित समोर आले असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 2 हजार 148 रूग्ण कोरोनावर मात करत ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.
राज्यातील कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची एकूण संख्या आता 66,09,906 झाली आहे. तर, राज्यात एकूण 140196 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, आजपर्यंत राज्यातील एकूण 64,49,186 कोरोना बाधित बरे होऊन घरी परतले आहेत. याच बरोबर राज्यातील रिकव्हरी रेट 97.57 टक्क्यांवर पोहोचला आहे.