बीड कोरोना अपडेट; पहा कशी आहे जिल्ह्याची कोविडस्थिती.

बीड दि.10 नोव्हेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 825 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 5 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 820 जण निगेटिव्ह आली आहेत. आज चार तालुक्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-0, आष्टी-2, धारुर-1, गेवराई-0, केज-0, माजलगाव-1, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-1 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या झपाट्याने उतरली आहे. गेल्या आठवड्यापासून समाधानकारक स्थिती आहे. सोमवारी 7, मंगळवारी 10 तर आज बुधवारी 5 बाधितांची संख्या आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार मंगळवारी 6 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यू संख्येत दोनने वाढ होवून जिल्ह्यात मृत्यूची एकुण संख्या 2811 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 67 झाली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ- उतार पाहायला मिळत आहे. राज्यात मंगळवारी 982 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1293 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 61 हजार 956 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.62 टक्के आहे.

राज्यात मंगळवारी 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 13 हजार 311 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,33,262 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 867 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 33 , 99, 355 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!