बीड कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी.

बीड दि.12 नोव्हेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 928 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 5 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 923 जण निगेटिव्ह आली आहेत. आज केवळ तीन तालुक्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-1, अंबाजोगाई-2, आष्टी-0, धारुर-0, गेवराई-0, केज-0, माजलगाव-0, परळी-2, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या आज झपाट्याने खाली आली आहे. बुधवारी 5, गुरुवारी 12 तर आज शुक्रवारी बाधितांची संख्या 5 आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार गुरुवारी 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात मृत्यूची एकुण संख्या 2813 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 68 आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात गुरुवारी 997 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1016 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 64 हजार 948 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के आहे.

राज्यात गुरुवारी 28 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 12 हजार 352 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,10,264 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 876 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 36 , 30, 632 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!