बीड कोरोना अपडेट; धारुर, परळीत सर्वाधिक रुग्ण, पहा तालुकानिहाय आकडेवारी .

बीड दि.22 नोव्हेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 365 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 7 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 358 जण निगेटिव्ह आली आहेत. आज पाच तालुक्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-1, अंबाजोगाई-0, आष्टी-0, धारुर-2, गेवराई-0, केज-0, माजलगाव-01 परळी-2, पाटोदा-1, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या आज दहाच्या आत आहे. शुक्रवारी 13, शनिवारी 13, रविवारी 10 तर आज 7 आली आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार रविवारी 8 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एका मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूची एकुण संख्या 2820 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 82 आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे 845 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 730 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 64 लाख 75 हजार 682 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.67 टक्के आहे.
तसेच रविवारी दिवसभरात 17 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 40 हजार 739 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Death Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील मृत्यूदर स्थिरावला आहे.