बीड कोरोना अपडेट; 24 तासात 2 मृत्यू… पहा आजचे तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.24 नोव्हेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 707 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 8 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 699 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सात तालुक्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-1, अंबाजोगाई-1, आष्टी-1, धारुर-0, गेवराई-1, केज-0, माजलगाव-2, परळी-1, पाटोदा-0, शिरुर-1, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत कालपेक्षा आज वाढ झाली आहे. सोमवारी 7, मंगळवारी 5 तर आजची 8 संख्या आली आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार मंगळवारी 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी दोन मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूची एकुण संख्या 2822 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 80 आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी 766 नव्या कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली , 929 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दहा हजारांच्या खाली आली असून, सध्याच्या घडीला 9 हजार 493 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 लाख 31 हजार 297 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 77 हजार 379 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.68 टक्के झाला आहे. राज्यात 19 रुग्ण दगावले असून, आजवर 1 लाख 40 हजार 766 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!