आज धारुरचे ५९ तर जिल्ह्यातील ५७९ स्वॅब; ॲन्टीजन टेस्टमधून माजलगाव ६६ तर केज १९ पॉझिटीव्ह 

किल्लेधारूर दि.१८(वार्ताहर) काल धारुरचे ५९ लोकांचे तर जिल्ह्यातील ५७९ लोकांचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली असुन आज रात्री त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे. जिल्ह्यात आज पाच शहरात व्यापाऱ्यांची ॲन्टीजन टेस्ट करण्यात येत असल्याने पॉझिटीव्ह रुग्णांची आजची आकडेवारी मोठी असणार आहे. आत्तापर्यंत माजलगावमध्ये ६६ तर केजमध्ये १९ व्यापारी पॉझिटीव्ह आढळली आहेत.

धारुर शहरात गेल्या सतरा दिवसांपासून दररोज पॉझिटीव्ह रुग्ण सापडत आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातही पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येत आहेत. घागरवाडा, गोपाळपुर, उमरेवाडी, कासारी बोडखातही रुग्ण आढळून आली. काल येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत ५९ लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले तर जिल्ह्यातील इतर ठिकाणाहून ५७९ लोकांचे स्वॅब पाठवण्यात आली आहेत. या स्वॅबचे अहवाल आज रात्री प्राप्त होणार आहेत. जिल्ह्यात लॉकडाऊन असलेल्या माजलगाव, परळी, केज, आष्टी व अंबाजोगाई शहरात आज दि.१८ सकाळ पासुन सर्व व्यापाऱ्यांची ॲन्टीजन टेस्ट करण्यास सुरुवात झाली. दुपारपर्यंत या टेस्टमधून माजलगाव मध्ये ६६ तर केजमध्ये १९ व्यापारी पॉझिटीव्ह आढळली होती. धारुरसह अकरा तालुक्यातील मुर्ती विक्रेत्यांचीही ॲन्टीजन टेस्ट होत आहे. यामुळे जिल्ह्याची आजची पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या सर्वाधिक असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!