बीड जिल्हा कोरोना अपडेट; पहा काय आहे आजची स्थिती.

बीड दि.14 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1981 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 21 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1960 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी तपासणी जास्त असताना बाधितांची संख्या कमी असून स्थिती समाधानकारक आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-4, अंबाजोगाई-0, आष्टी-4, धारुर-0, गेवराई-3, केज-1, माजलगाव-2, परळी-4, पाटोदा-1, शिरुर-2, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत बऱ्यापैकी कमी झाली आहे. जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे सत्र थांबलेले नसून काल नवीन 1 व जुने 2 मृत्यू नोंदवण्यात आले. बुधवारी 29 कोरोना बाधितांची सुट्टी करण्यात आली. जिल्ह्यातील एकुण मृत्यूची संख्या 2788 झाली आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर राज्यात सर्वाधिक 2.70 इतका आहे. तर बुधवारपर्यंत जिल्ह्यात एकुण 194 ॲक्टीव रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात बुधवारी कोरोनाचे 2,219 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3,139 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 64 लाख 11 हजार 075 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.38 टक्के आहे. तसेच 49 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात 29 हजार 555 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 05 लाख 46 हजार 572 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 83 हजार 896 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 32 हजार 261 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,122 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!