बीड कोरोना अपडेट; समाधानकारक रविवार, ॲक्टीव रुग्ण संख्याही अटोक्यात.

बीड दि.28 नोव्हेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 957 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 2 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. यामुळे बीड जिल्हा सध्या कोरोनामुक्त होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. आज जिल्ह्यातील तब्बल नऊ तालुके कोरोनामुक्त दिसून आले आहेत. जिल्ह्यात आता 68 ॲक्टीव रुग्ण आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-1, आष्टी-0, धारुर-0, गेवराई-0, केज-0, माजलगाव-0, परळी-1, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आज मोठी घट होवून जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल दिसत आहे. शुक्रवारी 4 असलेली बाधितांची संख्या शनिवारी 12 वर पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात होती. आज मात्र ही संख्या दोन वर आल्यामुळे समाधानकारक स्थिती आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार शनिवारी 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात शनिवारी 1 मृत्यूची नोंद झाली. मृत्यूची एकुण संख्या 2828 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 68 आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात दिवसभरात 889 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर 17 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 2.12 टक्के इतकं झालं आहे. आज राज्यात 738 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 80 हजार 799 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.7 टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 52 लाख 56 हजार 850 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 33 हजार 612 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!