गुरुवारी होणार नगराध्यक्ष आरक्षण सोडत; पहा कशी होईल सोडत.

मुंबई दि.24 जानेवारी – महाराष्ट्रात नुकत्याच 106 नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या असून आता नगराध्यक्ष (mayor) पदाच्या निवडी होणार आहेत. येत्या गुरुवारी (दि.27) रोजी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडत होणार असून यानंतर नगराध्यक्ष पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा होणार आहे.
(The mayor will leave the reservation on Thursday; See how it will leave.)
राज्यात 106 नगर पंचायतच्या निवडणूका होवून मतमोजणी अंति सत्तेवर कोणत्या पक्षाचा दावा होईल हे सिद्ध झाले. नगरसेवकांचा घोडाबाजार होवू नये म्हणून यापुर्वीच नगराध्यक्ष पदाची सोडत सदस्य निवडीनंतर घेण्याचा निर्णय झाला होता. अनेक ठिकाणी सत्तेच्या किल्ल्या अपक्षांच्या व छोट्या पक्षाच्या हाती असल्याने उत्कंठा वाढलेली आहे.
नगराध्यक्ष पदाची सोडत गुरुवारी
आज सोमवारी (दि.24) नगर विकास विभागाकडून नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण (reservation) सोडतीचे आदेश काढण्यात आले. गुरुवार दि.27 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता प्रधान सचिव नगर विकास-2 यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आरक्षण सोडत होणार आहे. सदरील सोडत मात्र अॉनलाईन पध्दतीने काढण्यात येणार आहे.
यासाठी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींना राज्यातील विभागीय आयुक्तालयात उपस्थित रहावे लागणार आहे. तशी व्यवस्था करण्याच्या सुचना नगर विकास विभागाच्या वतीने राज्यातील आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. तसे पत्र नगर विकास विभागाच्या (Urban Development Department) उप सचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
बीड जिल्ह्यात पाच नगराध्यक्ष
बीड जिल्ह्यात पाच नगर पंचायतच्या निवडणूका पार पडल्या. यात केज, वडवणी, आष्टी, पाटोदा व शिरुर कासार या नगर पंचायतीचा समावेश आहे. यातील आष्टी, पाटोदा व शिरुर कासार या तीन नगर पंचायतीवर भाजपाचे (BJP) निर्विवाद वर्चस्व आहे.
वडवणी येथे आ. प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व माजी आमदार केशव आंधळे यांच्या आघाडीने बहुमत मिळवले आहे. सध्या वडवणीचे राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक जि.प. सभापती जयसिंग सोळंके यांच्या निगराणीत सहलीवर आहेत. केजमध्ये (Kaij) मात्र स्वाभिमानीच्या हाती सत्तेची चावी आहे. यामुळे येथे नगराध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागून आहे.