बीड कोरोना अपडेट; राज्यात चिंता मात्र जिल्ह्यात समाधान, पहा बीडसह राज्याची स्थिती.

बीड दि.29 नोव्हेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 386 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 2 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. बीड जिल्हा सध्या कोरोनामुक्त होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. आज जिल्ह्यातील तब्बल नऊ तालुके कोरोनामुक्त दिसून आले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-0, आष्टी-1, धारुर-0, गेवराई-0, केज-0, माजलगाव-1, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आज दुसऱ्या दिवशी मोठी घट होवून जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल आहे. शनिवारी 12 असलेली बाधितांची संख्या रविवारी व सोमवारी 2 वर आल्यामुळे दिलासा मिळत आहे. दरम्यान रविवारी आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार शनिवारी 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यूची एकुण संख्या 2828 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 68 आहे.
दरम्यान, राज्यात रविवारी 832 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 841 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 64 लाख 81 हजार 640 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात रविवारी 33 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 8 हजार 193 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.सध्या राज्यात 85 हजार 874 रुग्ण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 53 लाख 57 हजार 358 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 34 हजार 444 (10.15 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.