बीड कोरोना अपडेट; सहा तालुक्यात आढळले रुग्ण, पहा बीडसह राज्याची स्थिती.

बीड दि.29 नोव्हेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 895 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 7 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. दोन दिवसानंतर आज बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. आज सहा तालुक्यात बाधित आढळून आले.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-1, अंबाजोगाई-0, आष्टी-2, धारुर-1, गेवराई-0, केज-1, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-1, शिरुर-0, वडवणी-1 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट दिसून आल्यावर आज मात्र वाढ झाली आहे. सोमवारी व मंगळवारी 2 वर असलेली बाधितांची संख्या आज 7 वर आली आहे. सोमवारी आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यूची एकुण संख्या 2828 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 65 आहे.
दरम्यान, राज्यात सोमवारी 539 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 853 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली असून सध्या 7 हजार 854 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 21 कोरोना मृत्यूची नोंद झाली.
राज्यातील एकूण कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या 66 लाख 34 हजार 980 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 82 हजार 493 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.70 टक्के एवढा आहे.