बीड कोरोना अपडेट; आज दोन तालुक्यात आढळले एवढे रुग्ण, पहा तालुकानिहाय स्थिती.

बीड दि.3 डिसेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1101 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 4 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1097 जण निगेटिव्ह आहेत. आज बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी कमी आली आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-3, आष्टी-1, धारुर-0, गेवराई-0, केज-0, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-1, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत दिवसेंदिवस घट दिसून येत आहे. राज्यात नव्या वेरियंटचा धोका असताना जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. गुरुवार (दि.2) आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एका मृत्यूची वाढ होवून एकुण संख्या 2830 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 70 आहे.

दरम्यान, गुरुवारी राज्यातील कोरोनाची आकडेवारी हजाराच्या आत आली आहे. राज्यात बरे (Recover) होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या 7 हजारावर आली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. राज्यात गुरुवारी 796 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 952 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात आतापर्यंत 64 लाख 85 लाख 290 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.71 टक्के आहे. तसेच 24 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 049 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!