बीड कोरोना अपडेट; आज चार तालुक्यात येवढे रुग्ण, पहा तालुकानिहाय स्थिती.

बीड दि.5 डिसेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1145 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 5 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1140 जण निगेटिव्ह आहेत. काल अचानक वाढलेली कोरोना बाधितांची संख्या आज कमी झाली आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-0, आष्टी-2, धारुर-0, गेवराई-0, केज-1, माजलगाव-0, परळी-1, पाटोदा-0, शिरुर-1, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत दिवसेंदिवस घट दिसत असताना काल अचानक वाढ दिसून आली होती. मात्र आज रविवारी संख्या कमी आल्यामुळे दिलासा मिळाला. शनिवारी (दि.4) आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार 3 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2831 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 74 झाली आहे.
दरम्यान, राज्यात शनिवारी 782 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी एक रुग्ण ओमायक्रॉनचा (Omicron) आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या 66 लाख 38 हजार 071 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 86 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज 770 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.71 टक्के एवढा आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत घट झाली असून, सध्या 7 हजार 129 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजवर 1 लाख 41 हजार 149 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.