बीड कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.7 डिसेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1141 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 6 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1135 जण निगेटिव्ह आहेत. कोरोना बाधितांची संख्या आज सलग तिसऱ्या दिवशी कमी झाली आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-3, आष्टी-2, धारुर-0, गेवराई-0, केज-1, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत दिवसेंदिवस घट दिसत असताना काल अचानक वाढ दिसून आली होती. मात्र काल व आज संख्या कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. सोमवारी (दि.5) आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार 4 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2831 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 64 झाली आहे.
दरम्यान, राज्यात सोमवारी 518 नवीन कोरोना बाधित रुग्ण (corona patients) सापडले. तर 811 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,39,296 झाली आहे.
राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही कमी होऊन 6853 इतकी आहे. आज 811 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,87,593 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.72 % एवढे झाले आहे. सध्या राज्यात 78,801 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 893 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.