बीड कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.9 डिसेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1951 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 06 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1915 जण निगेटिव्ह आहेत. कोरोना संशयितांच्या चाचण्यांत वाढ करण्यात आली आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-2, अंबाजोगाई-2, आष्टी-1, धारुर-0, गेवराई-0, केज-1, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आज घट दिसून आली. बुधवारी (दि.8) आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार 6 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2833 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 57 झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात बुधवारी दिवसभरात राज्यात 893 नव्या कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली असून, 1,040 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला लागला असून, सध्या राज्यात 6 हजार 286 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात बुधवारी 10 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 40 हजार 888 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 89 हजार 720 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.72 टक्के एवढा आहे.