बीड कोरोना अपडेट; वडवणीनंतर आज केवळ या तालुक्यात आढळले रुग्ण… इतर तालुके निरंक.

बीड दि.11 डिसेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1667 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 2 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1665 जण निगेटिव्ह आहेत. कोरोना संशयितांच्या चाचण्यांत वाढ करण्यात आली असून आज केवळ अंबाजोगाई तालुक्यात 2 रुग्ण आढळले आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-2, आष्टी-0, धारुर-0, गेवराई-0, केज-0, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत काल मोठी वाढ दिसून आली. एकट्या वडवणी तालुक्यात 16 बाधित आढळली होती. आज जिल्ह्यात दिलासादायक चित्र असून केवळ अंबाजोगाई तालुक्यात 2 रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी (दि.10) आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या निरंक होती. मृत्यू संख्येत मात्र एका जुन्या नोंदीसह दोनने वाढ झाली. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2835 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 73 झाली आहे.

दरम्यान, राज्यात शुक्रवारी 695 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 631 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 90 हजार 936 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे.

राज्यात शुक्रवारी 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 534 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 75 हजार 290 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 870 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 66 , 39, 988 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!