बुलढाण्यात आमदाराचे अख्खे कुटूंब कोरोना पॉझिटीव्ह; 14 जणं कोरोना बाधित.

बुलढाणा दि.6 मार्च – राज्यातील विविध भागात सध्या कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. बुलडाण्यातही कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना उद्रेकात आज चक्क बुलढाण्याच्या (Buldhana) आमदाराचे अख्खे कुटूंब कोरोना पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे.
(MLA’s entire family corona positive in Buldhana; 14 people infected with corona.)
बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या परिवारातील 12 सदस्य तसेच त्यांचा चालक व टंकलेखक असे एकूण 14 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. आ. गायकवाड हे विधिमंडळ अधिवेशनासाठी मुंबईत असून ते कोरोनापासून सुरक्षित आहेत. आ. गायकवाड यांची पत्नी, सून व 12 दिवसांची नात, दोन पुतणे, वहिनी, दोन भाचे, भाच्यांच्या दोन मुली, एका भाच्याची पत्नी तसेच वाहन चालक व टंकलेखक कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आले आहेत.
यामुळे गायकवाड यांचे घर व कार्यालय 11 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. तोवर कुणीही भेटू नये. असे आवाहन आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी सोशल मीडियावरून केले आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढलेला आहे. यामुळे प्रशासनाने संचारबंदी, लॉकडाऊन सारखे निर्बंध घातलेली आहेत. यातच आमदाराचं अख्खं कुटूंब कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) आल्याने प्रशासनाचा ताण वाढला आहे.