बीड कोरोना अपडेट; अंबाजोगाई व केज तालुक्यात आढळले येवढे रुग्ण.

बीड दि.14 डिसेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 748 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 4 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 744 जण निगेटिव्ह आहेत. आज केवळ दोन तालुक्यात रुग्ण आढळले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-3, आष्टी-0, धारुर-0, गेवराई-0, केज-1, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत सलग तिसऱ्या दिवशी मोठी घट दिसून आली. आज दोन तालुक्यात 4 रुग्ण आढळले आहेत. सोमवारी (दि.13) आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 7 होती. जिल्ह्यात एका मृत्यूची वाढ होवून एकुण मृत्यू संख्या 2836 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 72 झाली आहे.
दरम्यान, सोमवारी महाराष्ट्रात दिवसभरात 569 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रूग्णांचं निदान झालं आहे तर पाच मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर हा 2.12 टक्के इतका आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून कमी झालेला नाही.
महाराष्ट्रात सोमवारी दिवसभरात 498 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 93 हजार 2 रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.72 टक्के इतका झाला आहे.