बीड कोरोना अपडेट; चार तालुक्यात आढळले रुग्ण… पहा राज्याची स्थिती.

बीड दि.15 डिसेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1141 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 5 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1136 जण निगेटिव्ह आहेत. आज चार तालुक्यात रुग्ण आढळले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-1, आष्टी-0, धारुर-1, गेवराई-0, केज-0, माजलगाव-1, परळी-2, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत सलग दिवसेंदिवस घट दिसून येत आहे. आज चार तालुक्यात 5 रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी (दि.14) आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 7 होती. जिल्ह्यात एका मृत्यूची वाढ होवून एकुण मृत्यू संख्या 2836 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 72 झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी दिवसभरात 684 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 686 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 6 हजार 481 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 24 मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 45 हजार 136 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 93 हजार 688 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.72 टक्के एवढा झाला आहे.