बीड कोरोना अपडेट; आज परळी तालुक्यात आढळले रुग्ण.

बीड दि.16 डिसेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1374 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 2 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1372 जण निगेटिव्ह आहेत. आज केवळ परळी तालुक्यात रुग्ण आढळले आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-0, आष्टी-0, धारुर-0, गेवराई-0, केज-0, माजलगाव-0, परळी-2, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत सलग दिवसेंदिवस घट दिसून येत आहे. आज केवळ परळी तालुक्यात 2 रुग्ण आढळले आहेत. बुधवारी (दि.15) आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 5 होती. जिल्ह्यात दोन मृत्यूची वाढ होवून एकुण मृत्यू संख्या 2838 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 66 झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात बुधवारी दिवसभरात 925 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 929 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 6 हजार 467 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात 10 मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यातील एकूण कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या 66 लाख 46 हजार 061 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 94 हजार 617 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.72 टक्के एवढा झाला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!