बीड जिल्ह्यात दिलासा… मात्र… पहा आजचे कोरोना अपडेट.

बीड दि.15 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 832 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 12 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 820 जण निगेटिव्ह आली आहेत. मात्र जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा 3 कोरोना बळींची भर पडली आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-5, आष्टी-4, धारुर-0, गेवराई-0, केज-2, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-1, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या घटल्यामुळे दिलासा मिळत आहे. मात्र मृत्यू सत्र सुरुच आहे. गुरुवारी एक तर शुक्रवारी 3 कोरोना बळीची नोंद झाली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकुण मृत्यूची संख्या 2792 झाली आहे. शुक्रवार पर्यंतच्या नोंदी नुसार जिल्ह्यात एकुण 194 ॲक्टीव रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात 2149 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून 29 रुग्णांनी प्राण गमावले आहेत. तर मागील 24 तासांत 1898 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या राज्यात 29,782 सक्रीय रुग्ण आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण 64,15,316 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.37 टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,88,429 झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत 139734 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!