बीड कोरोना अपडेट; आज केज तालुक्यात सर्वाधिक रुग्ण.

बीड दि.20 डिसेंबर – जिल्ह्यात कोरोनाची दिलासादायक स्थिती आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 621 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 3 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 618 जण निगेटिव्ह आहेत. आज बीड व केज या दोन तालुक्यात रुग्ण आढळले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-1, अंबाजोगाई-0, आष्टी-0, धारुर-0, गेवराई-0, केज-2, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आज मोठी घट होवून दिलासादायक स्थिती आहे. आज केवळ 2 तालुक्यात 3 रुग्ण आढळले आहेत. केज तालुक्यात सर्वाधिक 2 बाधित आहेत. रविवारी (दि.19) आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 होती. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2838 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 55 झाली आहे.
दरम्यान, राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. रविवारी राज्यात 902 नव्या कोरोना बाधित रुग्णाची भर पडली आहे. तर 9 रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच कालावधीत राज्यात 767 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शनिवारी 854 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, यामध्ये रविवारी किंचीत वाढ झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 97 हजार 500 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71% इतके झाले आहे.