बीड कोरोना अपडेट; जिल्ह्यात दोन दिवसात इतके रुग्ण, पहा राज्याची काय आहे स्थिती.

बीड दि.25 डिसेंबर – गेली दोन दिवस जिल्ह्यात दिलासादायक चित्र आहे. आज बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे 1035 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 2 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1033 जण निगेटिव्ह आहेत. आज दोन तालुक्यात रुग्ण आढळले आहेत. राज्यात मात्र ओमायक्रॉनसह कोराना रुग्णांत वाढ झाली आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची आकडेवारी….
बीड-1, अंबाजोगाई-0, आष्टी-1, धारुर-0, गेवराई-0, केज-0, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत गेल्या दोन दिवसात मोठी आज घट झाली आहे. शुक्रवारी (दि.24) आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 10 होती. गुरुवारी मृत्यू संख्येत एकाने वाढ होवून जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2839 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 56 झाली आहे.
दरम्यान, राज्यात आज कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पहायला मिळत आहे. राज्यात आज 1410 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 868 रुग्ण कोरोनामुक्त (Coronavirus in Maharashtra) झाले आहेत.
मागील दोन -तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. त्यातच ओमायक्रॉन (Omicron) बाधित रुग्ण देखील आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. राज्यात आजपर्यंत 65 लाख 1 हजार 243 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.69 टक्के झाले आहे. राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के झाला आहे.