आर्यन खान ड्रग्ज प्रकरण; प्रभाकर साईलच्या गौप्यस्फोटानंतर फरार किरण गोसावी प्रकटला.

मुंबई, 25 ऑक्टोबर : आर्यन खान अटक (aryan Khan arrest case) प्रकरणाला आता नवीन वळण लागले आहे. पंच प्रभाकर साईलने केलेल्या गौप्यस्फोटानंतर अखेर फरार असलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) प्रकट झाला आहे.
(Aryan Khan Drugs Case; Fugitive Kiran Gosavi appeared after Prabhakar Sail’s assassination.)
माध्यमाशी बोलताना किरण गोसावीने आपण पोलिसांना (Police) शरण येणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच त्याने खंडणी घेतल्याचे आरोपही फेटाळून लावले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या किरण गोसावीचा अखेर ठावठिकाणा लागला आहे.
किरण गोसावी याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच आपण पोलिसांना शरण येणार असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर प्रभाकर साईल याने 25 कोटींच्या खंडणीचे केलेले आरोप हे निराधार आहे. मी कोणतीही खंडणी मागितली नाही.
शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) मॅनेजर पूजा ददलानी यांच्याशी कधीही भेटलो नाही, त्यामुळे अशी कोणतीही खंडणी मागितली नव्हती, असा दावाही त्याने केला. मला माझ्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार एनसीबीला (NCB) माहिती दिली होती. त्यानंतर क्रुझवर कारवाई करण्यात आली होती.
आर्यन खानसोबत (Aryan Khan) काढलेला सेल्फी एनसीबीच्या ऑफिसमध्ये नव्हे तर क्रुझवर काढला होता, असा दावाही गोसावी याने केला आहे. तसंच, माझ्या जीवाला धोका आहे, 3 तारखेनंतर अनेक खंडणीचे कॉल आले. त्यावर राजकारण सुरू आहे, असंही किरण गोसावी म्हणाला.
दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज (Drugs Case) प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साहिल यांनी सोमवारी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या (Crime branch) सहआयुक्तांची भेट घेतली आहे. तसंच त्यांनी कोर्टात एका प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून त्यामध्ये त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर खंडणी वसूल करण्याचा आरोप केले आहेत. तसंच समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं देखील त्यांनी रविवारी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे.
किरण उर्फ के. पी. गोसावी नेमका कोण? किरण गोसावी हा परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्स रिक्रूटमेंट कंपनीचा मालक असल्याची माहिती आहे. के. पी. जी. ड्रीम्स कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही तसा दावा केला होता.