बीड जिल्ह्यातून कोरोना होतोय हद्दपार… पहा आजचे जिल्हा व राज्याचे कोरोना अपडेट.

बीड दि.17 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 995 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 8 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 987 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-2, अंबाजोगाई-0, आष्टी-3, धारुर-0, गेवराई-0, केज-2, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-1, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना (Corona) हद्दपार होत असल्याचे दिसत आहे. काल दि.16 रोजी 12 तर आज चक्क 8 येवढी कमी बाधित आढळून आली आहेत. यामुळे बीड जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होण्याची आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील एकुण मृत्यूची संख्या 2792 झाली आहे. शनिवार पर्यंतच्या नोंदी नुसार जिल्ह्यात एकुण 186 ॲक्टीव रुग्ण आहेत.
दरम्यान, राज्यात दुसऱ्या लाटे नंतरची सर्वात कमी बाधित रुग्णसंख्येची नोंद आज झाली. आज 1553 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली असून मार्च नंतरची ही निच्चांकी नोंद आहे. राज्यात मृतांचा आकडा नियंत्रणात आला असून आज 26 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.
मृतांचा एकूण आकडा 1,39,760 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 29,627 इतकी आहे. शनिवारी 1553 नवीन रुग्ण सापडले असून कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,89,982 झाली आहे. कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण कमी झाले आहेत. तर 1682 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,16,998 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.38 % एवढे झाले आहे.