आर्या गायकवाड धारुर शहरातून पहिली; विविध शाळांचा निकाल व गुणवंत विद्यार्थी.

किल्लेधारूर दि.17 जुन – गेल्या काही दिवसांपासून उत्सूकता लागलेल्या दहावीचा अॉनलाईन निकाल आज जाहीर झाला. शहर व तालुक्यातील सर्वच शाळांचा निकाल उत्कृष्ट लागला. आतापर्यंत उपलब्ध निकालात शहरातील जनता विद्यालयाची विद्यार्थीनी आर्या जियाजी गायकवाड हिने 96.80 टक्के गुण घेवून शहरातून पहिली येण्याचा मान मिळवला आहे. तर गांजपूर येथील जीवन शिक्षण विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे.
हुतात्मा पापासिंह माध्यमिक विद्यालय
धारूर शहरातील हुतात्मा पापासिंह विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मार्च 2022 मध्ये झालेल्या एसएससी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली असून यशस्वी विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. परीक्षेसाठी 82 विद्यार्थी प्रविष्ट होते. शाळेचा एकूण शेकडा निकाल 98.78 लागला आहे.
शाळेतून सर्वाधिक गुण घेऊन सत्वधर संध्या संजय (95.60) प्रथम, मुंडे साक्षी संदीप (95.20) द्वितीय, चिरके सुप्रिया अशोक (94.40) तृतीय, शिंदे अथर्व रवींद्र (93.60), कंकाळ आदित्य आनंद (93.40), सुरवसे प्रणिता अशोक (93.20) मुंडे आरती विश्वास (93.20) रहेकवाल अमरदीप घनश्यामसिंह (92.60), आंधळे पूजा मकरध्वज (92.40) शेळके ओम सुधाकर (92.40) चौधरी आदित्य किरण (92.40) मुंडे बालाजी बाबुराव (92.20) शिनगारे रितेश सुनील (91.80) मुंडे गोविंद आत्माराम (91.40) शिंदे युवराज संतोष (91.00) तिडके हर्षदा हनुमंत (90.80) गित्ते ओंकार धनराज (90.80) मायकर ऋतुराज सुधाकर (90.40) तसेच 90.00 टक्के च्या वरती गुण घेऊन एकूण 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्याने 65 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आ. प्रकाशदादा सोळंके , सचिव आ. सतिशभाऊ चव्हाण तसेच शाळेचे मुख्याध्यापक सोळंके बी. एस. व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जनता माध्यमिक विद्यालय
धारूर शहरातील जनता माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दहावी (SSC) च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून आर्या जियाजी गायकवाड हिने 96. 80 टक्के गुण घेऊन शहरात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. जनता शाळेचे 39 विद्यार्थी 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेवून यश संपादीत केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जनता माध्यमिक विद्यालयाच्या 141 विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम आर्या जियाजी गायकवाड (96.80), दुसरा शंतनु शरद शिनगारे (96%), सृष्टी सचिन गायके (96%) प्रशांत महादेव चोले (95. 60) सिद्धी मुकुंद देवाकते (95.60) मोनिका संजय चोले (95. 40) ऋतुजा सोमनाथ गायके (95 टक्के) व इतर विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून या विद्यालयाचा निकालाची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा शिनगारे व इतर शिक्षकांनी कौतुक केले आहे.
सरस्वती विद्यालय
धारूर शहरातील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचा दहावी शांलात परीक्षेचा निकाल 98.87% लागला आहे. शाळेत प्रथम शेख मशिरा समशेर (94.0) द्वितीय मुंडे श्रुती अशोक (93%) तृतीय चव्हाण दिपाली शरद (93%) यांनी मिळवले असून या यशस्वी विद्यार्थ्याचे शाळेचे मुख्याध्यापक जगदीश तोष्णीवाल व शिक्षकानी कौतूक केले आहे
जीवन शिक्षण माध्यमिक विद्यालय गांजपुर धारुर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे निकाल शंभर टक्के लागला आहे. 90 टक्क्यांच्या पुढे विद्यालयातील 15 विद्यार्थी आहेत. यात प्रथम शुभांगी सिरसट (92%) , प्रदीप चौरे (92%) , द्वितीय प्रतीक्षा घुगे (91.20), तृतीय दराडे शुभम (90.30) विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रा. ईश्र्वर मुंडे, प्राचार्य विजयकुमार मुंडे, मुख्याध्यापक अरुण समुद्रे, सर्व कर्मचारी वृंद इत्यादींनी अभिनंदन केले आहे.
( Arya Gaikwad was the first from Dharur city; Results of various schools and meritorious students. )