बीड कोरोना अपडेट… आज अंबाजोगाई तालुक्यात विस्फोट; पहा तालुकानिहाय आकडेवारी….

बीड दि.13 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2033 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 45 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1988 जण निगेटिव्ह आहेत. आज 8 तालुक्यात रुग्ण आढळले असून अंबाजोगाईत अनेक दिवसानंतर उद्रेक दिसला.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-6, अंबाजोगाई-16, आष्टी-4, धारुर-0, गेवराई-2, केज-5, माजलगाव-4, परळी-5, पाटोदा-3, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आज मोठी वाढ दिसून आली आहे. एकट्या अंबाजोगाई तालुक्यात 16 बाधित आढळले. जिल्हा आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार काल 10 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2842 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 167 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 2.11 झाला आहे.

दरम्यान, राज्यात बुधवारी तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तर राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 2 लाख 25 हजार इतकी आहे. त्यातील 86 टक्के रुग्ण होम क्वारंटाईन असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

तसंच घरच्या घरीच सेल्फ किटद्वारे चाचणी करणाऱ्या नागरिकांना टोपे यांनी महत्वाचं आवाहन केलंय. राजेश टोपे म्हणाले की, काही लोक सेल्फ किटद्वारे कोरोना टेस्ट करत आहेत. त्यात त्यांची चाचणी पॉझिटिव्ह असली तरी ते संबंधित विभागाला कळवत नाहीत.

अशा लोकांनी जवळच्या आरोग्य केंद्रावर माहिती द्यायला हवी. आम्ही प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की, सेल्फ टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला जास्ती त्रास नसेल तर त्यांनी होम क्वारंटाईन राहू द्या. तुम्हाला दिवसातून फक्त दोन कॉल केले जातील आणि तुमच्यावर आरोग्यासंबंधी लक्ष ठेवलं जाईल असे स्पष्ट केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!