बीड जिल्हा अपडेट.. परळी, अंबाजोगाईचे टेंशन वाढले; पहा तालुकानिहाय आकडेवारी….

बीड दि.15 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1359 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 64 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1295 जण निगेटिव्ह आहेत. आज नऊ तालुक्यात रुग्ण आढळले असून सलग दुसऱ्या दिवशी अंबाजोगाईत बाधित मोठ्या संख्येत आढळल्याने टेंशन वाढले आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-12, अंबाजोगाई-18, आष्टी-5, धारुर-2, गेवराई-5, केज-6, माजलगाव-4, परळी-11, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-1 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आज दुसऱ्या दिवशीही धडकी भरवणारी वाढ दिसून येत आहे. अंबाजोगाई व परळीत बाधितांची संख्या अधिक आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार काल 13 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2842 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 253 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 2.83 झाला आहे.

दरम्यान, राज्यात आज 43,211 नवीन कोरोना रुग्ण आढळले, तर 19 मृत्यूची नोंद झाली.  शुक्रवारी दिवसभरात तब्बल 33,356 रुग्ण बरे झाले आहेत, दरम्यान राज्यात कोरोना सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 2,61,658 वर पोहचली आहे. आज नोंदवल्या गेलेल्या ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 238 होती, ज्यामुळे राज्यात एकून ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 1605 झाली आहे.

13,702 प्रकरणांसह, मुंबईत आदल्या दिवसाच्या तुलनेत गुरुवारपेक्षा रुग्णांमध्ये 16.55% ची घट नोंदवली गेली . मात्र ही घसरण राज्याच्या संख्येत दिसून आली नाही कारण गुरुवारी महाराष्ट्रात पुन्हा 46,406 हून अधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!