बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ कायम… धारुरातही मोठी वाढ, पहा तालुकानिहाय आकडेवारी….

बीड दि.18 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1650 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 144 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1506 जण निगेटिव्ह आहेत. आज पुन्हा 10 तालुक्यात रुग्ण आढळले असून आजही बीड तालुक्यात मोठ्या संख्येत बाधित आढळले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-37, अंबाजोगाई-19, आष्टी-16, धारुर-10, गेवराई-7, केज-3, माजलगाव-15, परळी-26, पाटोदा-10, शिरुर-0, वडवणी-1 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आज सलग चौथ्या दिवशी मोठी वाढ दिसून आली आहे. आज सर्वाधिक बाधित बीड तालुक्यात आढळून आले आहेत. आज जिल्ह्यात 144 रुग्ण आढळले आहेत. यापैकी एकट्या बीड तालुक्यात 37 आहेत.
बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या सोमवारच्या नोंदीनूसार 35 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात दोन मृत्यूची वाढ होवून एकुण मृत्यू संख्या 2845 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 496 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 12.22 टक्के झाला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये मागील 24 तासांत 31,111 नवे कोरोना रूग्ण समोर आले असून 24 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत तर दिवसभरात 29,092 जणांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रात सध्या 2,67,334 सक्रिय रूग्ण आहेत. आज 24 तासांत 122 ओमिक्रॉनचे नवे रूग्ण देखील समोर आले आहेत.
राज्यातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या 72 लाख 42 हजार 921 इतकी झाली आहे. मागील 24 तासात राज्यात 24 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह एकूण कोरोना मृत्यूंची संख्या 1 लाख 41 हजार 832 इतकी झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.95 टक्के एवढा आहे.
राज्यात सोमवारी 29 हजार 92 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण 68 लाख 29 हजार 992 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.3 टक्के एवढा झाला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांत बाधितांचा आकडा उतरला आहे.