बीड जिल्ह्यात पाच दिवसात 1300 रुग्ण… केजमध्ये वाढ, पहा तालुकानिहाय आकडेवारी….

बीड दि.23 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2144 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 290 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1894 जण निगेटिव्ह आहेत. आजही सर्वच तालुक्यात रुग्ण आढळले असून आज पुन्हा अंबाजोगाइत सर्वाधिक बाधित आढळले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-38, अंबाजोगाई-88, आष्टी-27, धारुर-5, गेवराई-22, केज-31, माजलगाव-20, परळी-42, पाटोदा-7, शिरुर-4, वडवणी-6 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बुधवारी, 205, गुरुवारी 239, शुक्रवारी 295, शनिवारी 307 रुग्ण आढळले. तर आज रविवारी यात भर पडून 290 रुग्ण आढळले आहेत. यापैकी एकट्या अंबाजोगाई तालुक्यात 88, परळी तालुक्यात 42 रुग्ण आहेत. जिल्ह्यात पाच दिवसात तेराशे पेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेत.
बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या शनिवारच्या नोंदीनूसार 64 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2845 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 1372 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट वाढून 12.80 टक्के झाला आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 46 हजार 393 नव्या रुग्णांची भर पडली असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 30,795 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल राज्यात कोरोनाच्या 48 हजार 270 रुग्णांची नोंद झाली होती म्हणजे आज कालच्या पेक्षा दीड हजाराने रुग्ण संख्या कमी झाली आहे.
राज्यात आज 416 ओमायक्रॉन (Omicron) बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 2759 ओमायक्रॉन बाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1225 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.