बीड जिल्ह्यात दिलासा… केज, धारुर वडवणीत रुग्णवाढ सुरुच, पहा तालुकानिहाय आकडेवारी….

बीड दि.24 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1165 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 177 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 988 जण निगेटिव्ह आहेत. आजही सर्व तालुक्यात रुग्ण आढळले आहेत. मात्र संशयितांच्या तपासणी संख्याही कमी आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-47, अंबाजोगाई-44, आष्टी-5, धारुर-7, गेवराई-8, केज-22, माजलगाव-10, परळी-11, पाटोदा-5, शिरुर-4, वडवणी-14 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या आज दिलासादायक आहे. गेल्या आठवड्यात वाढलेली संख्या आज दोनशेच्या आत आली आहे. रविवारी 290 रुग्ण आढळले होते. आज अंबाजोगाई तालुक्यात 44, बीड तालुक्यात 44 रुग्ण आढळले आहेत.
बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या रविवारच्या नोंदीनूसार 72 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात दोन मृत्यूची नोंद होवून एकुण मृत्यू संख्या 2847 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 1547 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी 12.80 टक्के वरुन 13.53 झाला आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूचे (corona virus) रुग्ण कमी होत असले तरी रविवारी राज्यात 40 हजार 805 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच कोरोनामुळे 44 लोकांना आपला जीव गमवावा लागला.
रविवारी एकही नवीन ओमिक्रॉनचा रुग्ण (omicron) आढळलेला नाही. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.15 टक्के एवढे आहे. रविवारी राज्यात 40 हजार 805 नवीन कोरोना रुग्णांची (corona virus) नोंद झाली असताना 27,377 रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी परतले.
राज्यात आजपर्यंत एकूण 70,67,955 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.89 टक्के एवढा आहे. मृत्यूदर कमी झाल्याने ताण कमी झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,33,69,912 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 75,07,225 (10.23 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.