३९ स्वॅब अहवालाची प्रतिक्षा; ॲन्टीजन टेस्टमध्ये आज १ होमगार्ड पॉझिटीव्ह तर एका संशयिताचा मृत्यू

किल्लेधारूर दि.२०(वार्ताहर) काल धारुरचे ३९ लोकांचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. आज रात्री त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे.आज पोलिस व होमगार्ड यांच्या ॲन्टीजन टेस्ट घेण्यात आली. या ॲन्टीजन टेस्टमध्ये १ होमगार्ड पॉझिटीव्ह आढळून आला आहे. तर अंबाजोगाई येथे उपचार घेत असलेल्या एका संशयित व्यक्तीचे निधन झाल्याची माहिती मिळाली असुन सदरील व्यक्तीचा स्वॅब अहवाल रात्री येणार आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या सुचनेवरुन येथील सर्व पोलिसांची ॲन्टीजन टेस्ट करण्यात येत आहे. काल २५ तर आज २७ कर्मचाऱ्यांची टेस्ट पुर्ण झाली. यात आज एक होमगार्ड शिपाई पॉझिटीव्ह आढळून आला. काल येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत ३९ लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. या स्वॅबचे अहवाल आज रात्री प्राप्त होणार आहेत. आज सकाळी शहरातील एकाचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एक संशयित उपचारा दरम्यान दगावल्याची माहिती समोर आली आहे. सदरील संशयिताचा स्वॅब अहवाल आज रात्री प्राप्त होणार आहे. यापुर्वी संबंधिताची ॲन्टीजन टेस्ट निगेटिव्ह आली आहे.