बीड जिल्हा कोरोना अपडेट… धारुर तालुक्यात रुग्ण वाढ, पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.28 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1385 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 150 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1235 जण निगेटिव्ह आहेत. आज सर्वच तालुक्यात रुग्ण आढळून आले आहेत. संशयितांच्या तपासणी संख्या आज दुसऱ्या दिवशीही कमी होती.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-24, अंबाजोगाई-42, आष्टी-16, धारुर-12, गेवराई-3, केज-5, माजलगाव-13, परळी-17, पाटोदा-3, शिरुर-6, वडवणी-9 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत गेल्या तीन चार दिवसांपासून चढ उतार दिसत आहे. आज अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक 42 रुग्ण तर बीड तालुक्यात 24 रुग्ण आढळले आहेत. आज धारुर तालुक्यात 12 रुग्ण आढळले आहेत.

बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या गुरुवारच्या नोंदीनूसार 106 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2847 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 1906 वरुन कमी होत 1755 झाली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात सक्रीय रुग्ण संख्या झपाट्याने वाढली होती. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट मात्र 12.44 वरुन 14.16 टक्के झाला आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 25 हजार 425 नव्या रुग्णांची भर पडली असून 42 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 36 हजार 708 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आज 42 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.86 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 71 लाख 97 हजार 001 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!