बीड जिल्हा कोरोना अपडेट… पहा काय आहे आजची तालुकानिहाय स्थिती.

बीड दि.2 फेब्रुवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1802 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 110 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1692 जण निगेटिव्ह आहेत. बीड जिल्ह्यात मागिल 72 तासात 5 कोरोनाबळींची नोंद झाली आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-25, अंबाजोगाई-25, आष्टी-11, धारुर-4, गेवराई-9, केज-4, माजलगाव-5, परळी-17, पाटोदा-1, शिरुर-8, वडवणी-1 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत चढ उतार सुरुच आहे. आज बीड व अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक प्रत्येकी 25 रुग्ण तर परळी तालुक्यात 17 रुग्ण आढळले आहेत. धारुर व केज तालुक्यात बाधितांची संख्या 4 आहे.

बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या मंगळवारच्या नोंदीनूसार बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मंगळवारी 240 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यू संख्येत गेल्या 72 तासात 5 ने वाढ होवून जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2852 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 1200 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 10.47 टक्के, रिकव्हरी रेट 96.23 तर डेथ रेट 2.65 आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 14 हजार 372 नव्या रुग्णांची भर पडली असून 94 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.84 टक्के झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 30 हजार 093 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यात मंगळवारी एकाही ओमायक्रॉन (Omicron) बाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 3221 ओमायक्रॉन बाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1682 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 73 लाख 97 हजार 352 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.63 टक्के आहे. सध्या राज्यात 10 लाख 69 हजार 596 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2731 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 47 लाख 82 हजार 391 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!