बीड जिल्हा कोरोना अपडेट… पहा रविवारची तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.6 फेब्रुवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1196 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 48 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1148 जण निगेटिव्ह आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-8, अंबाजोगाई-8, आष्टी-4, धारुर-0, गेवराई-2, केज-9, माजलगाव-6, परळी-3, पाटोदा-6, शिरुर-1, वडवणी-1 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या आज मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. गुरुवारी 149, शुक्रवारी 116, शनिवारी 115 तर आज रविवारी केवळ 48 बाधित आढळले आहेत. आज केज तालुक्यात सर्वाधिक 9 तर बीड व अंबाजोगाई तालुक्यात प्रत्येकी 8 रुग्ण आढळले आहेत.

बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या शनिवारच्या नोंदीनूसार 233 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2858 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 853 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 7.22 टक्के, रिकव्हरी रेट 95.56 तर डेथ रेट 2.65 आहे.

दरम्यान, राज्यात आज दिवसभरात 1,394 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 21,677 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 77 लाख 94 हजार 034 एवढी झाली आहे. त्यापैकी 75 लाख 13 हजार 436 रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट 96.40 टक्के आहे.

राज्यात आज 68 जणांचा मृत्यू झाला असून आजवर एकूण 1,43,008 रुग्ण मृत्युमुखी झाले आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.83 टक्के आहे. सध्या राज्यात 2,447 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. तर 7,95,442 जण होम क्वारंटाईन आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!